चार बायका एकत्र आल्या की नक्की काय करतात????

myma app women empowerement swayampoorna foundation social work

असे म्हणतात कि चार बायका एकत्र आल्या कि फक्त निरर्थक गप्पा.. मात्र आम्हाला असे अजिबात नाही वाटत, मोठं-मोठी समस्याही त्या गप्पा मारता मारता सोडवू शकतात. आता हेच बघा ना..

प्रत्येक आईसाठी एक प्रश्न… बाहेर राहणारी आपली मुलं रोज मेस आणि हॉटेल मध्ये पोटभर, हेल्दी जेवतात?


शिक्षणासाठी, कामासाठी घरापासून दूर राहणाऱ्या मुलांचा नेहमीचा न सुटणारा प्रश्न म्हणजे घरच्या जेवणाचा. बाहेर मेस आणि हॉटेलचं एकाच चवीचं आणि अनहेल्दी खाणं त्यांना अनेक आजारपण लावून जातं.. कित्येक मुलं तर फक्त खाण्याचे हाल होतात म्हणून शिक्षण, नोकरी सोडून घरी गेलेली उदाहरणंही आपल्याला ठाऊक आहेत. हा खूप मोठा प्रश्न आहे आणि अनेकांनी ह्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेत मात्र विशेष काही बदल घडला नाही. अहो अशा सगळ्या गोष्टींचा त्या आईला किती त्रास होत असणार.. जगात कुठलीच आई नाही जिला तिच्या मुलांच्या खाण्याची चिंता नाही, पण प्रत्येकीने चिंताच करत बसायची कि मार्ग काढण्यासाठी पुढं यायचं? ह्या न सुटणाऱ्या प्रश्नाला सोडविण्यासाठी प्रत्येक घरातली आई एकत्र येतेय आणि मायमा होऊन सगळ्यांचाच जेवणाचा प्रश्न सोडवतेय.

काय आहे मायमा संकल्पना?

प्रत्येक घरातल्या आईने, गृहिणीने ती तिच्या घरच्यांसाठी रोज काय जेवण बनवणार आहे ते सांगावे आणि कोणाला ते हवं असल्यास त्याच्यासाठीही बनवावे. अर्थात यासाठी तिने पैसे आकारावे म्हणजे खाणाऱ्याला निःसंकोच जेवण ऑर्डर करता येईल. यासाठी तिने काहीही वेगळे करायचे नाही, रोजचं साधं जेवण जे हॉटेल मध्ये मिळत नाही तेच द्यायचे. यामुळे नुसते घरच्या खाण्याचा प्रश्न सुटणार नाही तर त्या प्रत्येक सुगरणीला तिचे पाक कौशल्य जगासमोर आणण्याची संधीही मिळेल. आपण केलेल्या स्वयंपाकाचे कौतुक न आवडणारी अशी एकही सुगरण शोधून सापडणार नाही.

मायमा संकल्पना आवडली मात्र हे करायचे कसे?

तुम्हाला मायमा म्हणून काम करणे सोपं जावं यासाठी आम्ही “मायमा” अँप उपलब्ध करून दिलेय. मायमा अँपवर रजिस्ट्रेशनसाठी पैसे द्यावे लागत नाही, ऑर्डरवर कमिशनही नाही… मायमा अँप फ्री आहे. अँप वापरासाठी अत्यंत सोपे असून ते मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषेमध्ये उपलब्ध आहे.

Know more about the Myma Platform

How to work as a Myma?

Download the Myma App

स्वयंपूर्णा फाऊंडेशनचा “मायमा” एक सामाजिक उपक्रम आहे.
आमचे ध्येय “प्रत्येकाला घरचं हेल्दी आणि टेस्टी जेवण मिळावं, प्रत्येकीला घरबसल्या स्वतःची एक नवी ओळख मिळावी!”

स्वयंपूर्णा फाऊंडेशनचा ‘मायमा’ हा उपक्रम तुमच्या सहभागाशिवाय अपूर्ण आहे…

आणि त्यासाठी फक्त ३ गोष्टी करायच्या आहेत!
१. उत्तम स्वयंपाक बनवता??? मायमा व्हा..
२. मायमा कडून हेल्दी जेवण ऑर्डर करा..
३. मायमा संकल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करा.!

स्वयंपूर्णा फाऊंडेशन – सहानुभूती नाही… संधी!

2 thoughts on “चार बायका एकत्र आल्या की नक्की काय करतात????

  1. Maz registration hotch nai food license fasai tarfe kadal tari kahi na kahi issue yeto ahe tymule myma hou shakali nahi me ek house wife’ahe

Leave a Reply