1. दररोज मील पब्लिश करा…
जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळविण्यासाठी तुम्हाला दररोज तुमच्या हातचे रुचकर पदार्थ अपलोड करणे अनिवार्य आहे… कारण जर तुम्ही मील पब्लिश केलेच नाही तर कस्टमरला कळणारच नाही आणि तो ऑर्डरही करणार नाही. त्यामुळे दररोज जे बनवत आहात ते पब्लिश करा. मील पब्लिश करणे हे फक्त काही सेकंदांचे काम आहे आणि मील पब्लिश करायला थोडीच पैसे लागतात??? ते तर पूर्णपणे फ्री आहे… आणि जेवणसुद्धा आपण ऑर्डर आली तरच आणि तेवढेच बनवणार आहोत त्यामुळे अन्नही वाया जाणार नाही.
2. तुमचे स्पेशल पदार्थ पब्लिश करा…
जे पदार्थ उत्तम बनवता ते स्पेशॅलिटी म्हणून पब्लिश करा. त्याचसोबत ज्या ज्या रेसिपी तुम्ही 30 ते 40 मिनिटांत बनवून देऊ शकता ते तर नक्कीच स्पेशॅलिटी मील म्हणून पब्लिश करा. जसे की शिरा, पोहे, खिचडी, वरण-भात, पिठलं-भाकरी, भजी, इ. हे पदार्थ तुम्हाला रोजच द्यायची सुद्धा गरज नाही. आठवड्याचे वार ठरवून घ्या आणि त्याप्रमाणे अपलोड करा.
3. मील सोशल मीडियावर शेअर करा…
तुम्ही पदार्थ तर उत्तम बनवताच… मीलही पब्लिश करता… पण तुम्ही असे काही करत आहात हे लोकांना समजणे पण तर महत्वाचे आहे ना??? आणि ते तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही स्वतः ते मील पब्लिश केल्यानंतर सोशल मीडियावर म्हणजेच व्हाट्सॲप स्टेट्स किंवा मेसेज, फेसबुक, इंस्टाग्रामवर शेअर कराल. मील शेअरींगचा ऑप्शन तुम्हाला पब्लिश केलेल्या मीलच्या इथे दिसेल.
4. फक्त १० मायमा…
तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्यांसुद्धा मायमाबद्दल सांगा आणि मायमा म्हणून रजिस्टर करायला सांगा. त्यांच्यातल्या पाककलेला जगासमोर आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा.
लक्षात घ्या, तुमच्या परिसरात जास्तीत जास्त मायमा असणे हे तुमच्याच फायद्याचे आहे…
कस्टमरला जेव्हा जास्तीत जास्त ऑप्शन दिसतील तेव्हाच तो मायमा ॲपवरून ऑर्डर करणार आहे. त्याचसोबत जर सगळेच कस्टमर तुमच्याकडूनच ऑर्डर करायला लागले तर तुमच्यावरही त्या गोष्टीचा भार येईल आणि जरी समजा तुम्ही ऑर्डर्स कॅन्सल केल्या तरी त्याने नुकसानच आहे कारण मग ते कस्टमर पुन्हा तुमच्याकडून जेवण ऑर्डर करणार नाहीत. म्हणून तुम्ही तुमच्या परिसरात, किमान 10 ऍक्टिव्ह मायमांचा ग्रुप बनवा, प्रत्येकीने दररोज मील पब्लिश करा आणि आम्हाला तुमचे लोकेशन पाठवा… आम्ही तुमच्या लोकेशनवर स्पेशल मार्केटिंग सुरु करू, जेणेकरून तुम्हाला सर्वांना ऑर्डर्स मिळतील.
5. बारीक लक्ष ठेवा… फोनकडे!
लक्षात ठेवा, तुमच्याकडे ऑर्डर आल्यानंतर फक्त १० मिनिटांचा वेळ आहे ती स्वीकारायला… त्यामुळे मील पब्लिश केल्यानंतर फोनकडे बारीक लक्ष ठेवा जेणेकरून तुमची कोणतीही ऑर्डर कॅन्सल होणार नाही.
6. तुमच्या गावची चव सगळ्यांना कळू द्या…
जशी जागा बदलते तशी खाद्य संस्कृतीही बदलते. प्रत्येक गावाची / शहराची वेगळी खाद्य संस्कृती असते, वेगळे मसाले असतात, पदार्थ बनवण्याची पद्धत वेगळी असते… त्याचबरोबर काही पारंपरिक पदार्थ असतात, काही स्पेशल पदार्थ असतात जे फक्त त्याच ठिकाणी मिळतात; सगळीकडे नाही मिळत. हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये जरी एखादे वेळेस मिळत असले तरी तीच अस्सल चव असेलच असं नाही. म्हणूनच आपण आपल्या गावची चव टिकवायची आणि सगळ्यांपर्यंत पोहचवायची. तुमच्या गावचेसुद्धा असे काही पदार्थ किंवा पद्धती असतील जे तुम्ही घरी नेहमी करता पण बाहेर मात्र कधी कुठे मिळत नाही… ते पदार्थ नक्की पब्लिश करा आणि पदार्थाच्या माहितीमध्ये त्याबद्दल नक्की सांगा. इतर खवय्ये तर ऑर्डर करतीलच त्याचसोबत त्या गावचे लोक जे इकडे राहायला आले आहेत (तुमच्यासारखेच) त्यांनासुद्धा गावापासून दूर राहून गावाकडचं अस्सल जेवण चाखायला मिळेल.
7. नाही नाही… दर माफक ठेवा!!!
जेवणाचे दर ठरवताना हॉटेलप्रमाणे दर आकारू नका. नेहमी माफक दर ठेवा म्हणजे जास्तीत जास्त ऑर्डर मिळतील.
आणि त्याचसोबत हे सोप्पे सूत्र वापरा : खर्च + पॅकिंग खर्च + ५% पेमेंट गेटवे चार्जेस + अपेक्षित नफा = मील / जेवणाचे दर
8. अन्न हे पूर्णब्रह्म…
पापड, लोणचं, सलाड… या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे आपण देत असणाऱ्या पदार्थाला ‘पूर्ण जेवण’ बनवत असतात! त्यामुळे नेहमी जेवणासोबत असे काही छोटे-छोटे पदार्थ द्या म्हणजे कस्टमरला तर आवडेलच आणि तुम्हालाही अधिक ऑर्डर्स मिळतील.
9. स्पेशल पदार्थ… आपल्या स्पेशल कस्टमरसाठी!
काही वृद्ध लोक असतात, काहींना पथ्य असतात… हे लोक हॉटेलमधील जेवण नाही खाऊ शकत. म्हणून त्यांच्यासाठी कमी मसालेदार, कमी तेलकट पदार्थ पब्लिश करायचे आणि त्याबद्दल मील ऍड करताना ‘मीलबद्दल माहिती’ या ऑप्शनमध्ये सांगायचे म्हणजे ते लोकसुद्धा आपल्याला ऑर्डर देतील.
10. सेल्फ डिलिव्हरी…
जर तुम्हाला शक्य असेल तर जवळपासच्या ऑर्डर तुम्ही स्वतः डिलिव्हर करा म्हणजे डिलिव्हरी चार्जेसही तुम्हालाच मिळतील!
11. वेळ महत्वाची आहे…
ऑर्डर किमान 4-5 तास आधी पब्लिश करा म्हणजे कस्टमरला चेक करायला आणि ऑर्डर करायला वेळ मिळेल.
त्याचबरोबर शक्यतो लोक ज्या वेळेत नाश्ता किंवा जेवण करतात तो सर्व्हिंग टाइम म्हणजेच जेवण देण्याची वेळ ठेवा. जसे कि सकाळचा नाश्ता हा ७ ते ११ मध्ये होतो, दुपारचे जेवण ११ ते २ मध्ये होते… संध्याकाळी स्नॅक्स हे चहाच्या वेळेला म्हणजेच ४ ते ७ च्या मध्ये होते तर रात्रीचे जेवण ७ ते १०. पर्यंत होते. तुम्हीसुद्धा जे पदार्थ देत आहेत ते जेवण आहे का स्नॅक्स / नाश्ता याप्रमाणे त्याच वेळेत पब्लिश करा म्हणजे जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळतील.
12. जे हॉटेलमध्ये मिळत नाही ते…
मायमा ॲपवर आपण अनेकदा हॉटेलसारखे पदार्थ देण्याचा विचार करतो… पण आपल्याला बरोब्बर त्याच्या उलट करायचे आहे… म्हणजेच जे पदार्थ हॉटेलमध्ये मिळत नाहीत ते जास्तीत जास्त पब्लिश करायचे आहेत… म्हणजे लोक हॉटेलपेक्षा जास्त मायमा ॲपवरून ऑर्डर करायला सुरुवात करतील.
आणि सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे…
13. संयम…
आयुष्यात कोणतीही गोष्ट कमवायची म्हणजे संयम लागतोच. कोणतेही यश एका दिवसात नाही मिळत, अनेक दिवस सातत्याने प्रयत्न केल्यानंतर यश मिळते… तुम्हालाही मिळेल! तुम्ही फक्त दररोज मील्स पब्लिश करत राहा… ऑर्डर्स नक्की मिळतील!!!
17 thoughts on “मायमा ॲपवर जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळवण्यासाठी काही सिक्रेट टिप्स…”
Very nice idea
i want to publish meal & register for myma app
It’s Amazing
Nice thought and writeup.
Vardhaman nagar rukadi
Superb
छान ! व्यवसायिक युक्ती
छान ! व्यवसायिक युक्ती.
घरच्या अन्नाची चव हॉटेल च्या पदार्थांना नसते.
Very nice idea
Very nice idea
Very nice
Yes
Nice 🙂 always happy 😊
[email protected]
Nice tips
Very nice
Very nice