Home/Diner FAQs

नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न (FAQ) - डायनर

"कामानिमित्त अथवा शिक्षणानिमित्त अनेक मुलं घरापासून लांब, दुसऱ्या शहरात राहतात. अशा ह्या सगळ्यांपुढचा नेहमीचा आणि न सुटणारा प्रश्न म्हणजे 'रोजच्या जेवणाचा'... परिसरातील बहुतांशी हॉटेल, घरगुती मेस मध्ये हे जाऊन आलेले असतात पण त्यांना घरचे, आई सारखे, त्यांच्या गावाकडच्या पद्धतीचे जेवण कधी मिळतच नाही.
दुसऱ्या बाजूला बघायला गेले... तर जवळपास प्रत्येक घरातील गृहिणी तिच्या परिवारासाठी रोज वेगवेगळ्या पद्धतीचे जेवण बनवते. जर अशा गृहिणींना त्यांच्या रोजच्या जेवणाबरोबर ह्या अजून तीन-चार लोकांचा स्वयंपाक बनवायला सांगितला तर त्या आनंदाने बनवतील. म्हणजेच खाणाऱ्याला घरच्यासारखे नाही तर घरचेच जेवण मिळेल आणि त्या गृहिणीला घरबसल्या काम मिळेल. ह्या खाणाऱ्यांना आणि गृहिणींना जोडण्याकरिता आपण मायमा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. "
मायमा प्लॅटफॉर्म बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा... मायमा म्हणजे काय?

आपल्याला आईप्रमाणेच प्रेमाने आणि रुचकर जेवण बनून देणारी आहे 'मायमा' तर 'डायनर' म्हणजे आहेत खवय्ये; आणि मायमा प्लॅटफॉर्म म्हणजे हे ॲप/वेबसाईट ज्यावरून डायनर मायमाकडे जेवणाची मागणी करू शकतात.

हो. ऑर्डर आणि ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे.

नाही. नोंदणी करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

मायमा... होममेकर म्हणजेच गृहिणी आहेत. आपल्यामुळे त्यांना व्यवसाय करण्याची आणि स्वतःची नवी ओळख बनवण्याची संधी मिळत आहे.

ब्रेकफास्ट, लंच, डिनर आणि लंचबॉक्स (सकाळी ऑफिस/कॉलेजला घेऊन जायचा डबा) तुम्ही मायमा प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर करू शकता.

मील पोहचवण्यासाठी 'सेल्फ पिकअप' आणि 'डिलिव्हरी' असे २ पर्याय उपलब्ध आहेत.
सेल्फ पिकअप म्हणजेच डायनर स्वतः मायमाने सांगितलेल्या ठिकाणावरून मील घेऊ शकतो; आणि डिलिव्हरी म्हणजेच मायमा तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी मील आणून देते. प्रत्येक मील मध्ये डिलिव्हरी सुविधा असेलच असे नाही.

हो. परंतु तुम्हाला पहिली ऑर्डर करून तिचे पेमेंट करावे लागेल. त्यानंतरच तुम्ही पुढची ऑर्डर करू शकता.

हो. ऑर्डर करताना ज्या ठिकाणी तुम्हाला मील मागवायचे आहे तिथले लोकेशन सेट केल्यास, त्या लोकेशनला उपलब्ध असलेल्या मायमाकडून तुम्ही मील मागवू शकाल.

ऑर्डर प्लॅस्टिक कंटेनर्स आणि फॉयलींग मटेरियल मध्ये व्यवस्थित पॅक करून मिळेल. आपल्याला टिफिन देण्याची आवश्यकता नाही.

मायमावरील सर्व ऑर्डर प्रीपेड आहेत. आपण डेबिट/क्रेडिट कार्ड, ऑनलाइन वॉलेट किंवा यूपीआय आय. डी. मार्फत पैसे देऊ शकता.

तुमच्या ऑर्डर कन्फर्मेशन नंतरच तुम्ही मागवलेले मील बनवले जाणार आहे. कोणत्याही मायमाचे नुकसान होऊ नये यासाठी ऑर्डर प्रीपेड आहेत.

हा व्यवसाय नसून, होममेकर्स आणि डायनरकरिता सुरु केलेला एक उपक्रम आहे; त्यामुळे जेवणाचे दर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही मोठ्या प्रमाणावर ऑर्डर केली तरी तुम्हाला फायदा होईल असेच हे दर आहेत.

'मायमा प्लॅटफॉर्म' हे, घरचे आणि पौष्टिक जेवण सर्वांना मिळावे यासाठी आहे. म्हणूनच चांगल्या जेवणासाठी आम्ही ऑफर्स देत नाहीत, पण ते कमीत कमी किंमतीमध्ये तुम्हाला मिळावे याची नक्कीच काळजी घेतो.

हो. आपल्या सगळ्या ऑर्डर्स या ऍडव्हान्स ऑर्डर्सच आहेत.

जर डायनरने "ऑर्डर क्लोजिंग टाईम" च्या आत ऑर्डर कॅन्सल केली तर त्याला त्याच्या ऑर्डरचे पैसे पुन्हा मिळतील. जर डायनरने "ऑर्डर क्लोजिंग टाईम" नंतर ऑर्डर कॅन्सल केली तर त्याला त्याच्या ऑर्डरचे पैसे रिफंड मिळणार नाही, ते पैसे मायमाला मिळतील.

तुम्हाला चांगली सर्व्हिस आणि वेळेवर मील देण्यास आम्ही प्राधान्य देतो. मील देणाऱ्या मायमा ह्या होममेकर्स आहेत, त्यामुळे उशीर जर झाला तर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. उशिरा मिळालेल्या ऑर्डरवर कुठल्याही प्रकारची भरपाई मिळणार नाही.

मायमा प्लॅटफॉर्ममध्ये, मायमा यांनी, स्वतः बनवलेल्या मीलचे फोटो काढून अपलोड केलेले असतात, त्यामुळे याबद्दल तुम्ही नक्कीच निश्चिन्त राहावे. पण तरी असे झालेच तर आम्हाला कळवावे, आम्ही असे होणार नाही याबाबत योग्य ती काळजी घेऊ.

आमच्याशी संपर्क करणे सोप्पं आहे, ॲप मधील 'संपर्क' या विभागतुन तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता.