मायमा आणि डायनर

मायमा संकल्पना

कामानिमित्त अथवा शिक्षणानिमित्त अनेक मुलं घरापासून लांब दुसऱ्या शहरात राहतात. अशा ह्या सगळ्यांपुढचा नेहमीचा आणि न सुटणारा प्रश्न म्हणजे रोजच्या जेवणाचा... परिसरातील बहुतांशी हॉटेल, घरगुती मेस मध्ये हे जाऊन आलेले असतात पण त्यांना घरचे, आई सारखे, त्यांच्या गावाकडच्या पद्धतीचे जेवण कधी मिळतच नाही.

दुसऱ्या बाजूला बघायला गेले तर जवळपास प्रत्येक घरातील गृहिणी तिच्या परिवारासाठी रोज वेगवेगळ्या पद्धतीचे जेवण बनवते. जर अशा गृहिणींना त्यांच्या रोजच्या जेवणाबरोबर ह्या अजून तीन-चार लोकांचा स्वयंपाक बनवायचा सांगितला तर त्या आनंदाने बनवतील. म्हणजेच खाणाऱ्याला घरच्यासारखे नाही तर घरचेच जेवण मिळेल आणि त्या गृहिणीला घर बसल्या काम मिळेल… आता खाणाऱ्यांना आणि गृहिणींना जोडण्याकरिता आपण मायमा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. आपण गृहिणींना “मायमा” म्हणतो आणि खाणाऱ्यांना “डायनर” म्हणतो.

नेमके काय आणि कसे काम करायचे?
मायमा आज/उद्या काय बनवणार आहे हे ॲप मध्ये सांगते. जसे की दुपारी व रात्री तिच्या परिवाराकरिता जेवायला काय बनवणार आहे. डायनर त्याच्या जवळपासच्या घरातील मायमा काय-काय बनवणार आहे ते बघतो आणि त्याला जे खावेसे वाटेल ते त्या एका मायमाला त्याच्याकरिता जेवण बनविण्याची विनंती करतो त्याची विनंती ती स्वीकारते, त्याप्रमाणे ती स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी तिला मिळालेल्या एकूण ऑर्डर्स बघते आणि त्याप्रमाणे स्वयंपाक बनवते. तिचे जेवण तयार झाल्यावर डायनर स्वतः तिने सांगितलेल्या पत्त्यावरून पार्सल घेऊन जातो अथवा तिला शक्य असेल तर ती किंवा घरातील इतर व्यक्ती डायनरकडे पार्सल पोहोच करतात (डिलिव्हरीचे एक्स्ट्रा पैसे मिळतात). सोप आहे ना?

थोडक्यात व्यवसाय कोणता करायचा, कसा करायचा, कुठे करायचा आणि सर्वात महत्त्वाचे ग्राहक कसे आणायचे या आणि अशा इतर प्रश्नांकरिता आम्ही तुमच्या बरोबर आहोत… तुम्ही फक्त छान-छान जेवायला बनवा.

मायमाच्या दृष्टीने काही वैशिष्ट्ये
● ज्या दिवशी मायमा काय बनवणार आहे ते ॲप वर टाकणार नाही, त्या दिवशी तिची सुट्टी म्हणजे हा व्यवसाय रोज करायलाच हवा असे काही बंधन नाही.
● व्यवसाय सुरू करण्याकरिता कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची गरज नाही.
● व्यवसाय सुरू करण्यापासून तो सुरळीत सुरू होईपर्यंत आम्ही मार्गदर्शन करायला प्रत्येक मायमा बरोबर आहोत.
● ऑर्डर प्रीपेड असल्याने म्हणजे तुम्ही जेवण बनविण्याच्या आधीच डायनर कडून त्या ऑर्डरचे पैसे गेटवेकडे जमा झालेले असतात, त्यामुळे बनवलेले जेवण वाया जाण्याचा किंवा नुकसान होण्याचा प्रश्नच उरत नाही.
● हा उपक्रम प्रत्येक गृहिणीने स्वतःच्या पायावर उभं राहावं या हेतूने सुरू करण्यात आला आहे त्यामुळे तिच्यावर कुठल्याही प्रकारचा आर्थिक भार हा व्यवसाय सुरू करण्याकरिता पडणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे.
● याकरता लागणारे मार्गदर्शन / ट्रैनिंग विनामूल्य देण्यात येते.

मायमा संकल्पना

नेमकं काय आहे मायमा?

Myma Concept
मायमा

मायमा उपक्रमाबद्दल अधिक माहिती

मायमा ॲप

सुटसुटीत आणि वापरायला सोपे

मायमा प्लॅटफॉर्म संदर्भातील अधिक माहितीसाठी अँप इन्स्टॉल करा आणि अँपमधील ट्रैनिंग व्हिडिओ आणि प्रश्नोत्तराच्या विभागास भेट द्या.

Myma Concept Myma Concept