Home/Myma FAQs

नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न (FAQ) - मायमा

"कामानिमित्त अथवा शिक्षणानिमित्त अनेक मुलं घरापासून लांब, दुसऱ्या शहरात राहतात. अशा ह्या सगळ्यांपुढचा नेहमीचा आणि न सुटणारा प्रश्न म्हणजे 'रोजच्या जेवणाचा'... परिसरातील बहुतांशी हॉटेल, घरगुती मेस मध्ये हे जाऊन आलेले असतात पण त्यांना घरचे, आई सारखे, त्यांच्या गावाकडच्या पद्धतीचे जेवण कधी मिळतच नाही.
दुसऱ्या बाजूला बघायला गेले... तर जवळपास प्रत्येक घरातील गृहिणी तिच्या परिवारासाठी रोज वेगवेगळ्या पद्धतीचे जेवण बनवते. जर अशा गृहिणींना त्यांच्या रोजच्या जेवणाबरोबर ह्या अजून तीन-चार लोकांचा स्वयंपाक बनवायला सांगितला तर त्या आनंदाने बनवतील. म्हणजेच खाणाऱ्याला घरच्यासारखे नाही तर घरचेच जेवण मिळेल आणि त्या गृहिणीला घरबसल्या काम मिळेल. ह्या खाणाऱ्यांना आणि गृहिणींना जोडण्याकरिता आपण मायमा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. "
मायमा प्लॅटफॉर्म बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा... मायमा म्हणजे काय?

आपल्याला आईप्रमाणेच प्रेमाने आणि रुचकर जेवण बनून देणारी आहे 'मायमा' तर 'डायनर' म्हणजे आहेत खवय्ये; आणि मायमा प्लॅटफॉर्म म्हणजे हे ॲप/वेबसाईट ज्यावरून डायनर मायमाकडे जेवणाची मागणी करू शकतात.

होय, प्रत्येक गृहिणीला घरच्या जबाबदाऱ्या बघून घरबसल्या सुरु करता येण्यासारखा हा स्वतःचा व्यवसाय म्हणजे 'मायमा.' हा एक महिला सक्षमीकरणाचा उपक्रम आहे. अनेक पुरुषही खूप छान स्वयंपाक बनवतात हे आम्ही जाणतो पण सध्यातरी आम्ही पुरुषांची मायमा प्लॅटफॉर्मवर नोंदणी करून घेत नाही.

मायमा प्लॅटफॉर्मवर नोंदणीकरिता तुमच्या स्मार्टफोन मधील 'प्ले स्टोर'मधून मायमा ॲप इन्स्टॉल करा. ॲप मधील मायमा लॉग-इन या ऑप्शन मधील सूचनेनुसार सर्व माहिती भरून आधार कार्ड, पॅन कार्ड अपलोड करा व मायमाची नोंदणी फी भरा. म्हणजे तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
रजिस्ट्रेशनबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा : नोंदणी कशी करावी?

मायमा प्लॅटफॉर्म वापरासाठी वार्षिक फी भरावी लागते. ही फी आपण रजिस्ट्रेशन करताना भरू शकता किंवा ऑर्डर्स मिळाल्यानंतरही भरू शकता.
तुमच्या ऑर्डरमधून कमिशन आकारले जात नाही; परंतु ऑनलाईन पेमेंट गेटवेचे ५% प्रत्येक ऑर्डरमधून वजा केले जातात.

अन्न व औषधे विभाग म्हणजेच (FSSAI - Food Safety and Standards of India) हि एक सरकारमान्य संस्था आहे. हि संस्था विविध नियमांद्वारे, अन्न सुरक्षेची देखरेख करण्यासाठी आहे; ज्याचा उद्द्येश सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण आणि संवर्धन करणे हा आहे. कोणतीही अन्न विषयक खरेदी व विक्री करण्यासाठी FSSAI रजिस्ट्रेशन आवश्यक असते. मायमा प्लॅटफॉर्मवर व्यवसायाची नोंदणी करण्यासाठी हे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.

FSSAI रजिस्ट्रेशन ऑनलाईनच करता येते. विहित नमुन्यातील फॉर्म भरून पासपोर्ट साईझ फोटो, आधारकार्ड आणि डिक्लरेशन फॉर्म ऑनलाईन अपलोड केल्यावर साधारण १० ते १५ दिवसात FSSAI रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळते. FSSAI रजिस्ट्रेशनकरिता काही अडचण असल्यास आम्ही तुम्हाला मदत करू.

होय, तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन तुम्हाला हवे तेव्हा रद्द करू शकता. याकरिता तुम्ही [email protected] वर ई-मेल द्वारे कारणासह विनंती करणे आवश्यक आहे. मात्र तुम्हाला मायमा प्लॅटफॉर्मची रजिस्ट्रेशन फी परत मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

मायमा प्लॅटफॉर्मच्या नोंदणी फी व्यतिरिक्त तुमच्याकडून कुठल्याच प्रकारची फी घेतली जात नाही.

तुम्ही मायमा प्लॅटफॉर्मवर तुमचा व्यवसाय सुरु करणार आहात, याकरिता आमच्याकडे तुमची माहिती असणे आवश्यक आहे आणि आम्हाला तसे बंधनकारकही आहे. तुम्ही दिलेल्या माहिती आणि कागदपत्रांचा आमच्याकडून कुठल्याहीप्रकारचा गैरवापर होणार नाही.

होय! कारण सर्व व्यवहार ऑनलाईन होणार असल्याने बँक अकॉऊंट असणे गरजेचे आहे.

तुमच्या ऑर्डरचे पैसे प्रत्येक आठवड्याला तुमच्या बँक खात्यात जमा होतील.

होय, मायमा प्लॅटफॉर्म आणि ॲप कसे हाताळावे, यावर स्वतःचा व्यवसाय कसा सुरु करावा याकरिता आम्ही व्हिडिओद्वारे तुम्हाला प्रशिक्षण देतो. याकरिता तुम्ही आपल्या YouTube चायनल अथवा ॲप मधील ट्रेनिंग सेक्शनला भेट द्यावी.

मील पब्लिश करण्याच्या २ पद्धती आहेत. तुम्ही ॲप मधील 'मील लिस्ट' ला भेट द्यावी, यामध्ये तुम्ही भविष्यात देणार असलेले सर्वच मील एकदाच अपलोड करू शकता. म्हणजे दरवेळी पुन्हा पुन्हा तीच माहिती द्यायची गरज नाही, फक्त मील सिलेक्ट करून वेळ बदलली कि लगेच पब्लिश करता येईल. दुसरी पद्धत म्हणजे ऍड मील हे सेक्शन. याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या ट्रेनिंग सेक्शन मधील व्हिडिओत मिळेल.

नाही. मील पब्लिश करणे हे पूर्णतः तुमच्यावर आहे, याकरिता आमचे कुठलेच बंधन नाही. तुम्हाला शक्य असेल तेव्हाच तुम्ही मील पब्लिश करावा.

हो. आपण जे काही मील म्हणजेच जेवण देणार आहोत ते 'नक्की काय आहे' हे कळण्यासाठी फोटो टाकणे आवश्यक आहे. पण म्हणून इंटरनेटवरून घेतलेले फोटो टाकायचे नाहीत. आपण रोज जो स्वयंपाक करतो त्याचाच फोटो काढून ठेवायचा म्हणजे आपल्याला हवं तेव्हा आपण मील पब्लिश करू शकतो.
हे फोटो कसे काढायचे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा : फोटो कसे काढावेत?

हो! तुमच्या घरामध्ये बनविण्यात येणारे मील रोज अपलोड करायचे आहे. त्यामुळे मील दररोज बदलावे लागेल

होय! तुम्ही एकावेळी वेगवेगळे मील पब्लिश करू शकता.
1. ब्रेकफास्ट (नाश्ता)
2. लंचबॉक्स (जेवणाचा डब्बा)
3. लंच (दुपारचे जेवण)
4. डिनर (रात्रीचे जेवण)
पण एकाच प्रकारात एकापेक्षा जास्त मील पब्लिश करू शकत नाही

मील लिस्ट सर्वात महत्वाचे आणि उपयोगाचे आहे. जसे कि तुम्हाला माहिती आहेच कि रोज काय बनवणार आहे ते आपल्याला ॲपमध्ये पब्लिश करायचे आहे. जर तुम्ही रोज चारही प्रकारचे जेवण पब्लिश करणार असाल तर यामध्ये तुमचा बराच वेळ जाऊ शकतो, जो मील लिस्टचा वापर केला तर नाही जाणार. तुम्ही पब्लिश केलेले मील्स हे 'मील लिस्ट'मध्ये जतन करून ठेवले जाते, म्हणजेच आज पब्लिश केलेले मील तुम्हाला पुन्हा पब्लिश करायचे असेल तर मील लिस्टमध्ये शोधा आणि हवे ते बदल करून काही सेकंदामध्ये मील पब्लिश करा. मील लिस्ट मध्ये मील टाकण्याचा दुसरा पण मार्ग आहे. तुम्ही मील लिस्ट मध्ये 'मील ऍड करा' या ऑप्शनचा वापर करावा.
यासंदर्भात सविस्तर माहितीकरिता पुढील व्हिडीओ बघा. मील लिस्ट

आपण पुढच्या 4 दिवसांचे मील एकदाच पब्लिश करून ठेऊ शकता.

'ऑर्डर क्लोजिंग टाइम (Order Closing time)' म्हणजे ज्या वेळेला आपण स्वयंपाक बनवायला सुरुवात करतो तो टाइम. आणि 'मील सर्व्हिंग टाइम (Meal Serving Time)' म्हणजे ज्या वेळेला जेवण तयार असणार आहे तो टाइम.

अर्थातच तुम्ही. तुम्ही जेवण बनवता, त्यामागे होणार खर्च तुम्हालाच माहित आहे. त्यामुळे आपल्या मायमा प्लार्टफॉर्मवर 'मायमा' म्हणजे तुम्हीच तुमच्या जेवणाचे दर ठरवायचे.

दर ठरविणे सोप्प आहे. सर्वात आधी, तुम्ही देणार असलेल्या जेवणाचा एकूण खर्च काढा, त्यात पॅकिंगचा खर्च समाविष्ट करा, त्या नंतर पेमेंट गेटवेचे २.५% समाविष्ट करून तुम्हाला अपेक्षित असलेला नफा समाविष्ट करून बेरीज करा. तेच तुमच्या मील/जेवणाचे दर.
उदा. खर्च + पॅकिंग खर्च + पेमेंट गेटवे चार्जेच + अपेक्षित नफा = मील / जेवणाचे दर

आपल्या मायमा, या गृहिणी आहेत. ऑर्डर स्वीकारल्यानंतर जर डायनरने ऑर्डर कॅन्सल केली तर मायमाचे आर्थिक नुकसान होऊ शकते, ते होऊ नये यामुळे ऑर्डर प्रीपेड ठेवली आहे.

मायमा ॲपमध्ये तुम्ही पब्लिश केलेले मील, डायनर ऑर्डर करेल. डायनरने केलेली ऑर्डर स्वीकारण्यासंबंधी तुमच्या ॲपमध्ये मेसेज व रिंग येईल. आलेली ऑर्डर नीट वाचून तुम्ही ऑर्डर स्वीकारण्याकरिता तुम्हाला १८० सेकंदात निर्णय द्यायचा आहे. ऑर्डर स्वीकारायची किव्वा नाकारायची हे तुमच्या हातात असते. १८० सेकंदात तुमच्याकडून काही रिप्लाय न आल्यास ऑर्डर रिजेक्ट समजण्यात येईल.

ऑर्डर स्वीकारण्याबद्दलचे कोणतेच बंधन नाही. पण जितके मील बनवणे शक्य आहे, तितक्याच ऑर्डर स्वीकाराव्यात. जेणेकरून तुम्ही ऑर्डर स्वीकारून ती पूर्ण झाली नाही किंवा उशीर झाला तरी आपले नुकसान होणार नाही.

ऑर्डर तुम्हीच स्वीकारणार आहात... तेव्हा विचारपूर्वकच ऑर्डर स्वीकारा. पण जर अचानक ऑर्डर पूर्ण करता आली नाही; तर ऑर्डर कॅन्सल करणे बंधनकारक आहे. जेणेकरून डायनरचा वेळ वाचेल व त्यांचे पैसे त्यांना परत केले जातील.

जर डायनरने 'ऑर्डर क्लोजिंग टाईम'च्या आत ऑर्डर कॅन्सल केली तर त्याला त्याच्या ऑर्डरचे पैसे पुन्हा मिळतील.
जर डायनरने 'ऑर्डर क्लोजिंग टाईम'नंतर ऑर्डर कॅन्सल केली तर त्याला त्याच्या ऑर्डरचे पैसे रिफंड मिळणार नाही, ते पैसे मायमाला मिळतील.
जर मायमाने 'ऑर्डर क्लोजिंग टाईम'च्या आत ऑर्डर कॅन्सल केली तर तिला ऑर्डर कॅन्सलेशन चा दंड रु.२५/- आकारण्यात येईल.
जर मायमाने 'ऑर्डर क्लोजिंग टाईम'नंतर ऑर्डर कॅन्सल केली तर तिला ऑर्डर कॅन्सलेशन चा दंड रु.१००/- आकारण्यात येईल.

पेपर बॅग्स, फॉईल पेपर, फॉईल बॅग्स, प्लॅस्टिक कंटेनर (अन्नपदार्थ पॅकिंग करीता परवानगी असलेले डबे), इ. साहीत्य वापरून मील पॅक करावे. अधिक माहितीसाठी आमचा पॅकेजिंगचा व्हिडिओ बघावा. मील पॅकिंग

मायमा प्लॅटफॉर्मवर सध्या मील डिलिव्हरी करीता सेल्फ पिकअप (म्हणजे डायनर स्वतः मायमाकडे येऊन मील घेऊन जाईल) हा पर्याय उपलब्ध आहे. तसेच मायमा इच्छुक असेल तर सेल्फ डिलिव्हरी (मायमा स्वतः मील डायनरपर्यंत पोहचवेल.) करू शकता. सेल्फ डिलिव्हरीकरिता मायमाला एक्सट्रा डिलिव्हरी चार्जेस मिळतील. तुम्हाला तुमच्या घरून पिकअप ठेवण्याऐवजी इतर कुठल्या ठिकाणाचा पर्याय उपलब्ध आहे.

नाही, मायमा संकल्पना हि खूप साधी आहे, आपण रोज जे जेवतो ते घरचे जेवण, तयार जेवण. त्यामुळे तुम्ही जेवणाव्यतिरिक्त कुठलेही पदार्थ किंवा त्याचे साहित्य विक्रीस ठेऊ शकत नाही, तसे आढळल्यास, तुमचे मायमा प्लॅटफॉर्मवरचे रजिस्ट्रेशन रद्द होऊ शकते.

तुमचे व्हेरीफिकेशन झाल्यावर तुम्ही लगेच मील पब्लिश करू शकाल. पहिली ऑर्डर 'केव्हा मिळेल' याचा आम्ही अंदाज देणे चुकीचे असेल. कारण तुमच्या आजूबाजूला एकंदरीत किती डायनर आहेत हे तुम्हालाच माहित असणार आहे. काही मायमांना दुसऱ्याच दिवशी ऑर्डर मिळाली आहे तर काही मायमांना १५-२० दिवस लागले आहेत. कुठलाही व्यवसाय स्थिर व्हायला थोडा वेळ लागतो, गरज आहे ती फक्त आपण संयम ठेवण्याची.

होय! जिथे मायमा आणि डायनर आहेत तिथे मायमा प्लॅटफॉर्म आहे. फक्त काही ठराविक ठिकाणी मायमांची नोंदणी झाल्यानंतरच डायनर ऑर्डर करू शकतात.

आमच्याशी संपर्क करणे सोप्पं आहे, ॲप मधील 'संपर्क' या विभागातुन तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्ही फेसबुक मेसेंजरवर पण आहोत.